मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी जामीनीवर विशेष मोक्का कोर्टात निर्णय

January 28, 2011 4:09 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी

मालेगावमध्ये 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात 9 मुस्लिम तरुणांना अटक करण्यात आली होती. या बॉम्बस्फोट प्रकरणामध्ये स्वामी असीमानंद यांनी हा बॉम्बस्फोट आपण घडवून आणल्याची कबुली दिली. या पार्श्वभूमीवर अटकेत असलेल्या 9 तरूणांनी आपण निर्दोष असून आपल्याला जामीन मिळावा असा अर्ज केला होता. आरोपींच्या या जामीन अर्जावर विशेष मोक्का कोर्टाचे न्यायमूर्ती वाय. डी. शिंदे यांच्या कोर्टात आज एटीएस आणि सीबीआयनं स्पष्टीकरण दिलं. या स्पष्टीकरणानंतर विशेष मोक्का कोर्ट निर्णय घेणार आहे.

close