सलीम सय्यद यांच्या कुटुंबियांकडे सरकारचं दुर्लक्ष !

January 28, 2011 4:34 PM0 commentsViews: 2

28 जानेवारी

सरकारी अधिकार्‍यांवर माफियांकडून होणारे हल्ले ही नवी गोष्ट नाही. सरकारला जरी आत्ता जाग आली असली तरी अनेक कर्तव्यदक्ष अधिकारी याआधीही बळी गेले आहेत.आणि त्यांच्या कुटुंबियांकडे सरकारचं दुर्लक्ष झालं आहे. दोन वर्षापूर्वी नगर जिल्ह्यातल्या श्रीगोंदा इथं सलीम सय्यद या कोतवालाला वाळू तस्करांनी ठार मारलं होतं. सयद्द यानी वाळू तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र दोन वर्षानंतर अजूनही त्याच्या कुटुंबियांना कोणतीही मदत मिळालेली नाही. आज ही मदतीची वाट हे कुटुंबीय वाट पाहात आहे.

close