भेसळखोरांवर कारवाईमागचं नेमक कारण काय ?

January 28, 2011 6:14 PM0 commentsViews: 2

आशिष जाधव, मुंबई

28 जानेवारी

कर्तव्यदक्ष अधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येमुळे राज्याचं वातावरण ढवळून निघालं. एकीकडे एकाएकी भेसळखोरांवर कारवाईचा बडगा उगारला गेला. पण या कारवाईमागेराष्ट्रवादीतील मंत्री आणि विभागांमधला वाद लपवण्याचा हेतू असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.भेसळखोरांवर छापे आणि त्यांचं अटक सत्र राबवताना पोलिसांना कायदे आडवे येतात. जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांच्या देखरेखीखालीच पोलिसांनी कारवाई करावी लागते. पण बहुतेकवेळा अन्न आणि नागरी पुरवठा विभागाकडून पोलिसांना सहकार्य मिळत नाही. अशी खंत खुद्द गृहमंत्र्यांनी

व्यक्त केली. पण भेसळखोर किंवा काळाबाजार करणार्‍यांवर पोलिसांना कडक कारवाई करता येते. त्यांना इतरांच्या सहकार्याची गरज भासतेच कशी असा सवाल अन्न आणि नागरी पुरवठाममंत्र्यांनी उपस्थित करुन गृहमंत्र्यांवरच दोषारोपण केलं. यशवंत सोनवणेची हत्या झाल्या झाल्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी गृहविभागाच्या कारभाराला चांगलंच फाईलावर घेतलं होतं. पण नंतर भेसळमाफियांंसोबत भुजबळांचे लागेबांधे असल्याचा थेट आरोप झाल्यानंतर मात्र भुजबळ बिथरले. यशवंत सोनवणेंच्या हत्येच्या निमित्तानं तेलमाफिया आणि वाळू माफियांवर मोठी कारवाई केल्याचा आभास करुन आपल्याच पक्षाकडच्या विभाग आणि मंत्र्यांंमधला वाद लपवण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं चालवल्याची चर्चा सुरू झाली.

close