मनमाडमध्ये एकही छापा नाही ?

January 28, 2011 6:23 PM0 commentsViews: 4

दीप्ती राऊत, नाशिक

28 जानेवारी

नाशिक जिल्हायातील मनमाडमध्ये यशवंत सोनवणेंच्या हत्येनंतर तेलभेसळखोरांवर राज्यभर छापे सुरू झाले पण हे छापे फक्त दिखाऊ आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे.कारण मनमाड परिसरात एकही छापा टाकण्यात आलेला नाही.

मुंबई, नाशिक, सोलापूर, नांदेड, अहमदनगर, या जिल्ह्यात सरकारनं राज्यभर भेसळमाफियांवर धाडसत्र सुरू केलं. मात्र मनमाडजवळ ढाब्यावर तेलात भेसळ सुरू असताना घटनास्थळी पोहोचलेल्या ऍडिशनल कलेक्टर यशवंत सोनवणेंना पोपट शिंदे आणि त्याच्या गुंडांनी हल्ला चढवत जिवंत पेटवून दिलं. यानंतर राज्यभरात उमटलेल्या तीव्र प्रतिक्रियांमुळे जाग येत सरकारनं अखेर भेसळमाफियांवर कारवाई सुरू केली. राज्यभर छापे पडले, पण यात मनमाड आणि नांदगाव तालुक्या कुठेच छापे घालण्यातआलेले नाहीत. नाशिकध्येही ज्योती वाघ आणि वाल्मिकी पाटील या दोन किरकोळ भेसळ करणार्‍यांंविरुद्ध कारवाई करण्यात आली. खर तर मनमाड आणि परिसरात मोठ्याप्रमाणावर भेसळ सुरू असल्याची कबुली खुद्द जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच दिली होती. आता पालकमंत्र्यांच्या या कबुलीनंतरही पोलिसांनी मनमाड आणि नांदगावमध्ये छापे घातलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांच्या या वर्तनाचा नेमका अर्थ काय काढावा असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

close