सोनवणेंच्या हत्येला गृह मंत्रालयच जबाबदार -मुंडे

January 29, 2011 9:45 AM0 commentsViews: 1

29 जानेवारी

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांच्या हत्येला गृह मंत्रालयच जबाबदार आहे असा आरोप भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी केला.या हत्याकांडप्रकरणी गृह मंत्रालयावर कलम 302 चा गुन्हा दाखल करा अशी मागणी मुंडे यांनी केली. भेसळीतले छोटे मासे पकडून आर. आर. पाटील बनवेगिरी करीत असल्याची टीका मुंडे यांनी केली. गुन्हेगारांच्या हद्दपारी रद्द केल्यानंच अधिकार्‍यांचा मृत्यू झाल्याचं ते म्हणाले.

close