नाट्य संमेलनाला दिमाखात सुरुवात

January 29, 2011 9:50 AM0 commentsViews: 5

29 जानेवारी

रत्नागिरी 91 व्या मराठी नाट्य संमेलनाला दिमाखात सुरुवात झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संमेलनाचं उद्घाटन केलं. तर मावळते अध्यक्ष रामदास कामत यांनी राम जाधव यांच्याकडे संमेलनाची सूत्र प्रदान केली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी मान्यवरांचा सत्कार यावेळी केला. यावेळी रंगनाद या स्मरणिकेचं प्रकाशन करण्यात आलं. संमेलनासाठी अनेक नाट्य रसिक आणि कलाकार रत्नागिरीत दाखल झाले आहेत. यावेळी नाट्य परिषदेला पाच कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तर संमेलनाध्यक्ष राम जाधव यांनी नाट्य चळवळीचा आढावा घेतला.

close