अण्णा हजारे यांना ग्रॅन्ड मराठा हॉटेलमध्ये अपमानास्पद वागणूक

January 29, 2011 11:04 AM0 commentsViews: 3

29 जानेवारी

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना मुंबईतल्या आयटीसी ग्रॅन्ड मराठा हॉटेलमध्ये अपमानास्पद वागणूक देण्यात आली. एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमासाठी अण्णा काल शुक्रवारी मुंबईत आले होते. राज्यपाल के शंकरनारायणन यांच्या हस्ते त्यांना गोल्डन पिकॉक लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देण्यात आला. रात्री उशीर होणार असल्यानं अण्णांसाठी आयटीसी ग्रॅन्ड मराठामध्ये रुम बुक करण्यात आली होती. अण्णा हॉटेलमध्ये पोहचताच रिसेप्शन काऊंन्टरवर त्यांना रोखण्यात आलं. त्यांच्याकडे ओळखपत्र मागण्यात आलं. पण ओळखपत्र नसल्याने अण्णांना तब्बल एक तास हॉटेल बाहेर रोखण्यात आलं. या घटनेची माहिती मुख्यमंत्री, मुंबई कमिशनर संजीव दयाल यांना देण्यात आली. त्यानंतर या हॉटेलमध्ये पोलिस अधिकारी आल्यानंतर हॉटेलनं चूक मान्य केली. तसेच अण्णा हजारे यांना रुममध्ये एन्ट्री दिली.

close