शास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं निधन

January 29, 2011 11:24 AM0 commentsViews: 17

29 जानेवारी

शास्त्रीय गायक श्रीकांत देशपांडे यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते 63 वर्षांचे होते. पंडित भिमसेन जोशी यांचे ते शिष्य होते. सवाई गंधर्वांचे ते नातूही होते. किराणा घराण्याची परंपरा त्यांनी नेहमीच जपली. त्यांनी आपली गायकी बहरवली ती किराणा घराण्यात. सरस्वतीबाई राणे यांच्याकडे त्यांनी संगीताचे प्राथमिक धडे गिरवले. सरस्वतीबाई राणेंबरोबरच पंडित भीमसेन जोशी, पंडित फिरोज दस्तूर हे दोन दिग्गज गायकही त्यांना गुरू म्हणून लाभले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या एका खाजगी रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल दुपारनंतर त्यांची तब्येत अचानक ढासळली आणि आज सकाळी त्यांचं निधन झालं.

close