भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी नवीन कायदा करणार – अजित पवार

January 29, 2011 11:17 AM0 commentsViews: 6

29 जानेवारी

अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे जळीत हत्याकांड प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.तसेच भेसळीचे प्रकार रोखण्यासाठी राज्य सरकारच्या अधिकारात नवीन कायदा करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.तर या प्रकरणातील मुख्य आरोपी पोपट शिंदेला राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्यांचा पाठिंबा नसून विरोधकांनी सोनवणेंच्या मृत्यूचं राजकारण करू नये असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. कुठल्याही पक्षाचा कुठलाही बडा नेता या प्रकरणात असेल तर राज्यसरकार कठोर कारवाई करायला मागेपुढे पाहणार नाही असंही ते म्हणाले.

close