मुंबईत 2400 लिटर काळ तेल जप्त

January 29, 2011 11:56 AM0 commentsViews: 2

29 जानेवारी

यशवंत सोनवणे जळीत हत्याकांडानंतर राज्यभर तेलमाफियांच्या विरोधात कारवाईला सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसात मुंबईत पाच ठिकाणी धाडी मारण्यात आल्या आहेत. शुक्रवारी रात्री मुंबईतल्या मानखुर्द इथल्या मंडाला इथल्या स्क्रॅपसेंटरवरही तेल भेसळ सुरू असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे पोलिसांनी कुर्ला स्क्रॅपसेंटरवर छापा मारला. यावेळी या स्क्रॅपसेंटरमध्ये पोलिसांना जवळपास 2400 लिटर काळ्या तेलाचे 12 ड्रम सापडले आहेत. 39 पत्र्याचे आणि प्लॅस्टीकचे मोकळे ड्रम ही याठिकाणी जप्त करण्यात आले आहेत. तर 15 किलो सफेद पावडरही याठिकाणी सापडली. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे.

close