सचिनची अंध मुलांना खास भेट

January 29, 2011 12:35 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि रेकॉर्ड यांचं अतुट नातं आहे. बॅटिंगमधले जवळपास सर्व रेकॉर्ड त्याच्या नावावर आहेत.पण मैदानावर तो जितका तो लोकप्रिय आहे तितकाच मैदानाबाहेरही. सचिननं सामाजिक आणि भावनिक बाजूही वेळोवेळी सांभाळली आहे. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे त्यानं पुण्यात अंध मुलांबरोबर घालवेला वेळ. पुण्यातील कोरेगाव पार्क अंध शाळेच्या मुलांसाठी एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सचिन तेंडुलकरनं उपस्थितीती लावली. या कार्यक्रमाची कल्पना होती आयबीएन-लोकमतचे कन्सल्टिंग स्पोर्ट्स एडिटर सुनंदन लेले यांची. या कार्यक्रमात सचिननं अंध मुलांबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या. त्यांच्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरंही दिली. तसेच आपली स्वाक्षरी असलेली बॅटही शाळेला भेट दिली.

close