पंढरपूरजवळ 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त

January 29, 2011 1:30 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी

राज्यभरात गेल्या दोन दिवसांपासून धाडसत्राची कारवाई करण्यात येत आहे आता पर्यंत या 200 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर आज शनिवारी पंढरपूरजवळील टेंभुर्णी इथं 1 कोटीं रुपयांचं केमिकल जप्त करण्यात आलं. सोलापूर -पुणे हायवेवर हा छापा टाकण्यात आला. हे केमिकल पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळीसाठी वापरलं जातं होतं. या छाप्यात पोलिसांनी 4 टँकर जप्त केले. या हायवेवर गणी ढाब्याच्या मागे हा अवैध धंद्याचा अड्डा राजरोसपणे सुरू होता.

close