ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये किम क्लायस्टर्सला विजेतपद

January 29, 2011 1:54 PM0 commentsViews:

29 जानेवारी

ऑस्ट्रेलियन ओपनच्या महिला एकेरीत बेल्जिअमच्या किम क्लायस्टर्सनं बाजी मारली. चुरशीच्या झालेल्या फायनल मॅचमध्ये क्लायस्टर्सनं चीनच्या ली नाचा पराभव केला. ग्रँड स्लॅम स्पर्धेची पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठणार्‍या ली नानं सुरुवात दणक्यात केली. पहिला सेट तीनं 6-3 असा जिंकला. पण दुसर्‍या सेटमध्ये क्लायस्टर्सनं आपला खेळ उंचावला आणि हा सेट 3-6 असा जिंकत मॅचमध्ये बरोबरी साधली. तिसर्‍या सेटमध्ये मात्र क्लायस्टर्सनं ली नाला फारशी संधी दिली नाही. आणि हा सेट 6-3 असा जिंकत मॅचही खिशात घातली.

close