सोनवणे जळीतकांड प्रकरणी पेट्रोल टँकर हा प्रकाश जैन यांचा – खडसे

January 29, 2011 2:58 PM0 commentsViews: 6

29 जानेवारी

यशवंत सोनावणे जळीतकांड प्रकरणाला आता आणखी एक सनसनाटी वळण मिळालं आहे.भेसळ करण्यासाठी पोपट शिंदेच्या ठाब्यावर थांबलेला पेट्रोलचा टँकर हा प्रकाश जैन नावाच्या एका तेलमाफियाचा असल्याचं विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. हा प्रकाश जैन आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव अहिरवार यांचे जवळचे संबंध आहेत. त्यांची सातत्याने फोनवरून एकमेकांशी बोलणं होतं असा आरोपही एकनाथ खडसेंनी केला. शिवाय खडसे यांनी जळगांव जिल्ह्यातल्याच भुसावळ इथल्या किशोर कोटेचा यांच्यावरही आरोप केला आहे. कोटेचा हे प्रकाश जैन यांचे नातेवाईक असून त्यांचा गॅस सिलिंडरच्या काळ्याबाजाराशी संबंध आहे असा खडसेंचा आरोप आहे.

close