पेस भूपती जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव

January 29, 2011 4:37 PM0 commentsViews: 1

29 जानेवारी

भारताच्या लिएंडर पेस आणि महेश भूपती जोडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. ऑस्ट्रेलियन ओपनच्या डबल्स फायनलमध्ये अमेरिकेच्या बॉब आणि माईक या ब्रायन बंधूंनी पेस-भूपती जोडीचा दोन सरळ सेटमध्ये पराभव केला. ब्रायन बंधुंनी पहिला सेट 6-3 असा सहज जिंकला. दुसर्‍या सेटमध्ये पेस-भूपती जोडीनं लढत देण्याचा प्रयत्न केला. पण अव्वल सिडेड ब्रायन बंधूंनी पेस-भूपतीला फारशी संधी दिली नाही. दुसरा़ सेटही त्यांनी 6-4 असा जिंकत ऑस्ट्रेलियन ओपनचं जेतेपद पटकावलं.

close