आदर्शप्रकरणी सीबीआयचे छापे

January 30, 2011 8:36 AM0 commentsViews: 1

30 जानेवारी, मुंबई

आदर्श सोसायटी प्रकरणी सीबीआयने सकाळपासूनच धडक मोहीम हाती घेतली आहे. आदर्शच्या ऑफिसवर आणि प्रमोटर्सच्या घरांवर असे 7 ठिकाणी सीबीआयनेछापे टाकलेत. प्रमोटर कन्हैयालाल गिडवाणी, आर.सी. ठाकूर त्याबरोबरच आदर्शचे अध्यक्ष एम. एम. वांच्छू यांच्या घरावर सीबीआयने छापे टाकलेत. आर. सी ठाकूर यांच्या ठाणे, नागपूर आणि बिहारमधल्या पाटणा इथल्या घरांवर छापे टातले आहेत. तर गिडवाणींच्या पुण्यातल्या 2 घरांवर आणि ऑफिसवर तर वांच्छू यांच्या पुण्यातल्या घरावर छापा टाकण्यात आलाय. शनिवारी सीबीआयने आदर्शप्रकरणी 13 जणांविरोधात FIR दाखल केला होता. आणि त्यानंतर छाप्यांची धडक मोहिम हाती घेतली आहे.

close