तेलमाफियांना पाठीशी घालणा-या पोलिसांवर कारवाई करणार -मुख्यमंत्री

January 30, 2011 9:00 AM0 commentsViews: 4

30 जानेवारी, नाशिक

अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत सोनवणे यांना पेटवून मारणा-या पोपट शिंदेच्या तडीपारी प्रस्तावात उणीवा ठेवणा-या पोलीस अधिका-यांची चौकशी करणार असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं. पोपट शिंदेच्या तडीपारीचा प्रस्ताव मंत्रालयातून रद्द करण्यात आलाय. यावरुन गेले काही दिवस जोरदार वाद सुरु आहेत. पोपट शिंदेची रद्द झालेली तडीपारी या विषयावर सुरु असलेल्या या राजकीय वादाला अखेर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिलं. तसंच भेसळमाफीयांची पाळंमुळं खणून काढू असं आश्वासनही त्यांनी दिलंय.

close