युद्धनौका विंध्यगिरीला अखेर जलसमाधी

January 31, 2011 8:16 AM0 commentsViews: 27

31 जानेवारी

भारताची युद्धनौका आयएनएस विंध्यगिरीला जलसमाधी मिळाली. आयएनएस विंध्यगिरी ही भारताची महत्वाची युद्धनौका 90 टक्के बुडाली आहे. काल दुपारी विंध्यगिरीची एम.व्ही नॉर्डलेक या मालवाहू जहाजाशी टक्कर झाली होती. त्यानंतर विंध्यगिरी जहाजातल्या बॉयलरला आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी फायरब्रिगेडच्या आणि नौदलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण अखेर त्यांना अपयश आलं. यासोबतच विंध्यगिरीवर मोठ्या प्रमाणात तेलाचा साठा होता. तो काढण्यासाठीचे नौदलाने केलेले प्रयत्नही यशस्वी झाले नाहीत. कारण या युद्धनौकेवर रेस्क्यूटीमला जाण्यासाठी चिंचोळी जागा होती. त्यामुळे जवानांना अनेक अडचणी आल्या. अखेर काहीवेळापूर्वीच आग विझवण्याचे प्रयत्न थांबवण्यात आली आहे. विंध्यगिरी जिथं बुडालेय. तिथं समुद्राची खोली 7 मीटर आहे आणि समुद्राच्या तळाला लागून विंध्यगिरी एका बाजूला कलंडली. आता याप्रकरणी जहाज मंत्रालयानं चौकशीचे आदेश दिले आहे. तर नौदलाने याप्रकरणी चौकशी समिती स्थापन केली.

आएनएस विंध्यगिरी

-8 जुलै 1981 मध्ये ही युद्धनौका भारतीय नौदलात दाखल-113 मीटर रूंद-वजन-2,162 टन-स्पीड-28 एन.एम. (नाटिकॅल मैल) -50 कि.मी प्रति तास

close