तहसीलदारांवर हल्ला करणार्‍या 32 वाळू माफियांना लावला मोक्का

January 31, 2011 8:47 AM0 commentsViews: 93

31 जानेवारी

तहसीलदारांवर गोळीबार करणार्‍या 32 वाळू माफियांवर अहमदनगरमध्ये मोक्का लावण्यात आला आहे. वाळू माफियांना मोक्का लावण्याची राज्यातली ही पहिलीच वेळ आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवाशात गेल्या वर्षी 16 ऑगस्टला वाळू माफियांनी तहसीलदार दादासाहेब गीते यांच्यावर गोळीबार केला होता. इतकंच नाही तर त्यांना मारहाण करून त्यांची गाडी पेटवून देण्याचाही प्रयत्न केला होता. विशेष म्हणजे या वाळू तस्करीतला मुख्य आरोपी अण्णा लष्करे शिवसेनेचा नेता असून तो पंचायत समितीचा सदस्य आहे. मात्र अण्णा लष्करेसह 31 जण आजही फरार आहेत. पोलिस स्टेशनच्या समोर तहसीलदारांवर गोळीबार करण्यापर्यंत लष्करेची मजल गेली होती.

close