पुण्यात मराठी शाळांसाठी आंदोलन

January 31, 2011 9:00 AM0 commentsViews: 1

31 जानेवारी

मराठी शाळा टिकू द्या या मागणीसाठी आज पुण्यात आंदोलन करण्यात येतंय हे आंदोलन शिक्षण हक्क समन्वय समिती तर्फे करण्यात येत आहे. पालक आणि विद्यार्थ्यांनी शिक्षण संचालकांच्या ऑफिससमोर निदर्शनं करत घोषणाबाजी केली. गेल्या वर्षी शासनाने काढलेल्या निर्णयानुसार विनाअनुदानित मराठी शाळांना अनाधिकृत ठरवलं, त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येत होती. पण यानंतर वारंवार आश्वासने देऊन अजुनही सरकारने हा आदेश रद्द केलेला नाही. या प्रश्नावर आराखडा तयार करण्याची घोषणा सरकारनं केली होती. मात्र त्याबाबत काहीही हालचाली सरकारनं केल्या नाहीत असा आरोपही या पालकांनी केला.

close