केमिकल कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगार ठार

January 31, 2011 11:04 AM0 commentsViews: 2

31 जानेवारी

वाडा तालुक्यातल्या कोडले इथल्या केमिकलच्या कंपनीला लागलेल्या आगीत 2 कामगार ठार झाले आहे. फायब्रॉल नॉन आयो-निक्स प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीत इथोलीन ऑक्साईड ठेवण्यात येतं. काल रविवारी सकाळी रिऍक्टर बंद करताना स्फोट झाला आणि अचानक लागलेल्या आगीत कंपनीचे व्यवस्थापक धनाजी पाटील आणि कामगार संजय पाशिलकर हे दोघंही जळून अक्षरश: खाक झाले. मात्र इतर 9 कामगार पळून गेल्यानं त्यांचा जीव वाचला. वसई आणि भिवंडी इथल्या फायरब्रिगेडच्या गाड्यांनी ही आग विझवली.

close