इजिप्तमध्ये आंदोलन चिघळलं; 320 भारतीय भारतात दाखल

January 31, 2011 11:24 AM0 commentsViews: 3

31 जानेवारी

इजिप्तमध्ये अध्यक्ष होस्ने मुबारक यांना हटवण्यासाठी आंदोलन तीव्र झाल्यामुळे परिस्थिती चिघळली आहे. त्यामुळे तिथले भारतीय मायदेशी परतत आहेत. एअर इंडियाच्या विशेष विमानानं इजिप्तमधले 320 भारतीय आज मुंबईत दाखल झाले. त्यात महिला, मुले आणि पर्यटकांचा समावेश आहे. आणखी एका विमानातून आज इजिप्तहून आणखी काही भारतीय परतण्याची शक्यता आहे.

इजिप्तमध्येरात्रीपासून इजिप्तमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. कैरोच्या ताहरीर चौकामध्ये हजारो नागरिक जमले आहेत. या संघर्षात आतापर्यंत 150 जणांचा बळी गेला. गेली 30 वर्ष इजिप्तचे अध्यक्ष असणारे होस्नी मुबारक यांच्या विरोधात जनतेनं उठाव केला आहे.

close