पुणे महापालिकेत मनसेचं अनोख आंदोलन

January 31, 2011 3:58 PM0 commentsViews: 9

31 जानेवारी

पुणे महानगरपालिकेमध्ये आज मनसेच्या नगरसेवकांनी अनोख आंदोलन केलं. प्रशासन झोपा काढतंय, विकासकाम ठप्प आहेत याचा निषेध करण्यासाठी मनसेच्या नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेत चक्क पथारीच पसरली. बेडशीट्स घेऊन आलेल्या नगरसेवकांनी महापौरांसमोर हे आंदोलन केलं. सत्ताधारी आणि महानगरपालिका प्रशासन पुणेकरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मनसेनं यावेळी केला.

close