2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी अहवाल सादर

January 31, 2011 4:56 PM0 commentsViews: 1

31 जानेवारी

2 जी स्पेक्ट्रम घोटाळ्याप्रकरणी माजी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांनी दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांच्याकडे आज अहवाल सादर केला. यात माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि दूरसंचार सचिवांच्या भूमिकेवर ठपका ठेवण्यात आला. तर दुसरीकडे करुणानिधी आणि सोनिया गांधींची भेट होत असतानाच ए राजा यांची आज सीबीआयनं तिसर्‍यांदा चौकशी केली.

द्रमुकचे सर्वेसर्वा एम करुणानिधी दिल्लीत द्रमुक-काँग्रेस आघाडीच्या भवितव्याबद्दल चर्चा करण्यात गुंतलेत. तर दुसरीकडे द्रमुकचा दलित चेहरा असणारे माजी दूरसंचार मंत्री ए राजा आणखी अडचणीत आले आहेत. माजी न्यायमूर्ती शिवराज पाटील यांनी कपील सिब्बल यांच्याकडे 2 जी स्पेक्ट्रमचा अहवाल सादर केला. त्यात राजा यांच्यासोबत असणार्‍या दूरसंचार मंत्रालयातल्या काही अधिकार्‍यांची नावं असल्याची माहिती आहे.

आयबीएन-नेटवर्कला मिळालेल्या माहितीनुसार

ए. राजा यांच्यावर प्रक्रिया डावलल्याचा ठपका ठेवण्यात आलादूरसंचार विभागाचे माजी सचिव सिद्धार्थ बेहुरा, आर. के. चंडोलिया, तसंच राजा यांच्या खासगी सचिवांची नावं अहवालात आहेत. एनडीएनच्या काळात सुरू झालेल्या पहिल्यांदा येणार्‍याला प्राधान्य या धोरणाचा राजा यांनी गैरवापर केला. स्पेक्ट्रम वाटप गुणवत्तेनुसार करण्यात आलं नाही

या अहवालात अनेक सूचना करण्यात आल्या आहेत. त्यात धोरणात्मक निर्णयाला विरोध करणार्‍या अधिकार्‍यांना संरक्षण देण्याचीही सूचना आहे. दूरसंचार मंत्री कपील सिब्बल यांनी दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. भाजपनं मात्र पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर हल्लाबोल केला. दूरसंचार मंत्रालयातली प्रक्रिया सुधारण्यावर अहवालात भर देण्यात आला. पण अहवालाला मर्यादा असल्यानं त्याचा कितपत फायदा होईल याबद्दल शंका आहे.

close