कॉमनवेल्थ प्रकरणी शुंगलू समितीचा अहवाल सादर

January 31, 2011 5:23 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी

कॉमनवेल्थ घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी पंतप्रधानांनी नेमलेल्या शुंगलू समितीने आज आपला पहिला अहवाल सादर केला आहे.हा अहवाल कॉमनवेल्थ खेळांच्या प्रक्षेपण हक्कांविषयी आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या अहवालात प्रसार भारतीचे सीईओ बी.एस लाली यांना 135 कोटी रुपयांच्या नुकसानासाठी जबाबदार धरण्यात आलं आहे. लाली यांनी एस.आय.एस लाईव्ह या खाजगी कंपनीला जास्त किमतीत खेळांच्या प्रक्षेपणाचे हक्क विकल्याचा ठपका या अहवालात ठेवण्यात आला आहे. हीच समिती सध्या सुरेश कलमाडींच्या भूमिकेचाही बारकाईने तपास करत आहे.

close