मुंबईत भारत पर्यावरण चळवळीची सभा

January 31, 2011 5:26 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी

जैतापूर प्रकल्पाला विरोध करणारी भारत पर्यावरण चळवळीची एक सभा आज सोमवारी मुंबईत दादरमध्ये झाली. या बैठकीला तारापूर अणुउर्जाचे प्रकल्पग्रस्तही हजर होते. तारापूरच्या ग्रामस्थांचं पुनवर्सन योग्य पद्धतीने झालं नाही. आणि तिथे पर्यावरणाचेही गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत म्हणूनच जैतापूरला विरोध केला पाहीजे अशी भूमिका यावेळी मांडली गेली. तारापूरचा प्रकल्प जैतापूरच्या समर्थनासाठी रोल मॉडेल म्हणून उभा केला जातो. त्यामुळे, तारापूरला नक्की काय झालं हे लोकांसमोर यायला पाहीजे यासाठीच तारापूरच्या ग्रामस्थांना सोबत घेऊन ही आजची सभा केली असं आयोजकांनी सांगितलं. या बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे सदस्य एच.एम.देसरडा सुद्धा हजर होते.

close