भोईवाडा येथील मैदानासाठी सेनेचा आंदोलनाचा इशारा

January 31, 2011 5:34 PM0 commentsViews: 2

31 जानेवारी

मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेलाच भोईवाडा इथल्या मैदानासाठी आंदोलनाचा इशारा द्यावा लागला. सेनेच्या भोईवाडा विभागाने हा इशारा दिला. परळ भोईवाडा भागातल्या ऐतिहासिक सदाकांत ढवण मैदानाची दुरावस्था झाली. मैदानात चारी बाजूंनी जॉगिंग ट्रॅक बनवला गेला तेव्हा मैदानातलं पाणी बाहेर जाण्यासाठी कुठलीच व्यवस्था केली गेली नाही. त्यामुळे, मैदानात खड्डे पडून ते बाद होतं असा शिवसेनेचा आरोप होता. स्थानिक आमदार कालिदास कोळंबकर आणि नगरसेवक शकुंतला माने यांच्या स्वत:चा फंड चुकीच्या पद्धतीने वापरण्यामुळे हा प्रकार घडला असा शिवसेनेचे स्थानिक उपविभागप्रमुख विलास राणे यांनी आरोप केला.

close