कांदा व्यापार्‍यांचा लिलावावर बहिष्कार

February 1, 2011 9:56 AM0 commentsViews:

01 फेब्रुवारी

नाशिकमधल्या चांदवड आणि लासलगाव बाजार समित्यांनी 1 क्विंटल कांदा खरेदीत भरली जाणारी दोन किलोची घट रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांच्या हिताचा हा निर्णय बर्‍याच वर्षांच्या मागणीनंतर घेण्यात आला. मात्र लासलगावमधल्या व्यापार्‍यांनी याला विरोध केला. त्याच्या निषेधार्थ त्यांनी आजपासून लिलावावर बहिष्कार घातला आहे. घटीचा निकष सगळ्या बाजार समित्यांमध्ये सारखा असावा अशी व्यापार्‍यांची मागणी आहे. त्याचा फटका पुन्हा एकदा शेतकर्‍यांना आणि ग्राहकांना बसणार आहे.

close