अर्थमंत्री पी चिदंबरम आणि देशातल्या प्रमुख बँकर्सची बैठक

November 4, 2008 10:30 AM0 commentsViews: 5

4 नोव्हेंबर दिल्ली,अर्थमंत्री पी चिदंबरम यांची देशातल्या प्रमुख बँकर्सबरोबर बैठक आहे. सरकार नेहमीच भारतीय उद्योगक्षेत्राच्या पाठीशी असल्याचं पंतप्रधानांनी स्पष्ट केलंय. त्या पार्श्वभूमीवर उद्योगांना चलनपुरवठा कमी पडू नये यासाठी चिदंबरम बँकांना मार्गदर्शन करणार आहेत. बँकाच्या उद्योगांसाठी असणा-या कोट्यावर यावेळी चर्चा होईल. आर्थिक संकटात असणा-या आणि सध्या मंदी अनुभवणा-या उद्योगांकडून सतत स्वस्त व्याजदराची मागणी होतेय. यामुळे ही बैठक महत्वाची ठरणार आहे.

close