मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी प्रवीण मुतालिकला अटक

February 1, 2011 10:43 AM0 commentsViews: 5

01 फेब्रुवारी

2008 मध्ये झालेल्या मालेगाव बॉबस्फोटातला आरोपी प्रवीण मुतालिकला महाराष्ट्र एटीएस पथकानं अटक केली आहे. प्रवीण मुतालिक हा साध्वी प्रज्ञासिंग हिचा सहकारी आहे. मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तयारीत मुतालिकची भूमिका महत्त्वाची असल्याचं समजतं आहे. साध्वी प्रज्ञासिंग आणि कर्नल पुरोहित यांच्याशी मुतालिक सतत संपर्कात होता. बॉम्बस्फोटाबद्दल झालेल्या बैठकींनाही तो हजर राहिल्याचं समजतं. त्याला नेमकी कुठून अटक झाली हे अजून स्पष्ट झालं नाही. मुतालिक हा कर्नाटकातला आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्ता आहे. श्रीराम सेनेच्या प्रमोद मुतालिकशीही प्रवीण मुतालिक याचे संबंध असल्याचं समजतंय. त्याच्या अटकेमुळे मालेगाव बॉम्बस्फोटाविषयी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. प्रवीण मुतालिकला 14 फेब्रुवारी पर्यत पोलिस कोठडी ठोठवण्यात आली आहे.

close