नाशिक बाजार समित्यांमध्ये कांदा कपात रद्द

February 1, 2011 12:12 PM0 commentsViews: 3

02 फेब्रुवारी

नाशिक जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा कपात रद्द करण्यात आली आहे. सहकार निबंधकांच्या कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. एक क्विंटल कांद्यामागे 2 किलोची घट दाखवण्यात येत होती. बाजार समिती कायद्याच्या कलम 39 नुसार ही कपात बेकायदेशीर होती. इंडियन चेंबर ऑफ ऍग्रीकल्चर संस्थेनं याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायलयानं जिल्ह्यातल्या सर्व बाजार समित्यांना नोटीसा पाठवल्या होत्या. त्यानंतर लासलगाव आणि चांदवड बाजार समितीनं पहिल्यांदा ही कपात रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्याचा निषेध करत व्यापार्‍यांनी लिलावावर बहिष्कार टाकला होता. दरम्यान बैठकीत यात तोडगा काढून जिल्ह्यातल्या सर्वच बाजार समित्यांमध्ये ही कपात रद्द करण्यात आली.

close