महाराष्ट्र- कर्नाटक सीमेवर शिवसेनेचं ठिय्या आंदोलन

February 1, 2011 2:44 PM0 commentsViews:

01 फेब्रुवारी

सिमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी संघर्ष करणार्‍या सीमावासीयांसोबत आज शिवसेनेनं महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर कोगनोळी चेकपोस्ट जवळ रास्ता-रोको केला. कोल्हापूरचे शिवसेना कार्यकर्ते आणि बेळगावहून आलेल्या सीमावासीयांनी पुणे बेंगलोर महामार्ग क्र. 4 एक तास अडवून ठेवला. कार्यकर्त्यांनी महामार्गावर दोन्ही बाजूंना ठिय्या आंदोलन केलं. महाराष्ट्र पोलीस आणि कर्नाटक पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आमदार दिवाकर रावते, अरुण दुधवाडकर, आमदार राजेश क्षीरसागर, माजी आमदार मनोहर किणेकर, यांनी नेतृत्व केलं. एक तासानंतर कार्यकर्त्यांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली.

close