टीम इंडियावर अपेक्षांचं ओझं असल्याची धोणीची कबुली

February 1, 2011 2:53 PM0 commentsViews: 4

01 फेब्रुवारी

क्रिकेट वर्ल्ड कपचं काऊंटडाऊन आता सुरु झालं. आणि भारतीय टीम या स्पर्धेसाठी सज्ज झाल्याचं कॅप्टन महेंद्रसिंग धोणी यानं स्पष्ट केलं. इलेक्ट्रॉनीक वस्तूंचं उत्पादन करणार्‍या सोनी कंपनीने वर्ल्ड कपच्या पार्श्वभूमीवर ब्रावीया नावाचा नवीन एलसीडी तसेच एलईडी बाजारात आणला आहे. वर्ल्ड कप स्पर्धा घरच्या मैदानावर होत असल्याने टीम इंडियावर अपेक्षांचं ओझं असल्याची कबुली धोणीने यावेळी दिली. 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमला बांगलादेशकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे टीमला वर्ल्ड कपबाहेर पडावे लागले होते. यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये भारताची पहिली मॅच बांगलादेशविरुद्ध असल्यानं विशेष रणनिती आखल्याचं धोणीनं म्हटलं आहे.

close