अमेरिकेन एक्सप्रेस बँकेचे हजारो कर्मचारी बेरोजगार

November 4, 2008 10:32 AM0 commentsViews: 4

4 नोव्हेंबर, दिल्लीअमेरिकेतील निवडणुकीमुळे अमेरिकन एक्सप्रेस बँकेनं तिथल्या कर्मचार्‍यांना काढून टाकणं पुढं ढकललंय. पण कॉस्ट कटिंगची ही कुर्‍हाड अमेरिकन एक्सप्रेसच्या भारतातल्या कर्मचार्‍यांवर कोसळली आहे. दिल्ली आणि बंगळुरूमधील व्यवस्थापकिय स्तरावरील काही कर्मचार्‍यांच्या हातात कंपनीनं नारळ दिला आहे. या कर्मचार्‍यांमध्ये काहीजण पंधरा ते वीस वर्ष सेवेत असणारेही आहेत. त्यांना नवी नोकरी शोधण्यात मदत करण्यासाठी कंपनीनं एक कन्सल्ट्न्सी नेमली आहे. अमेरिकन एक्सप्रेसचे भारतात सहा ते साडेसहा हजार कर्मचारी आहेत.

close