अहमदनगरमध्ये तीन भेसळखोरांना अटक

February 1, 2011 3:02 PM0 commentsViews: 5

01 फेब्रुवारी

अहमदनगर पोलिसांनी गोविंदपुर्‍यात टाकलेल्या धाडीत साडेसात हजार लिटर सरकारी रॉकेल आणि 800 लिटर काळ तेल जप्त करण्यात आलं आहे. सूर्यकांत गाडे यांच्या घरावर हा छापा टाकण्यात आला होता. त्यांच्याकडे सरकारी रॉकेलचा घाऊक परवाना आहे. मात्र छापा घातला तेव्हा हे सर्व रॉकेल वितरित केल्याची खोटी नोंद त्यांच्या रेकॉर्डवर आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी रॉकेल भेसळीतला सराईत गुन्हेगार राहूल खंडेलवार याच्यासह विलास शिंदे, आयुब खान यांना अटक केली. भेसळीच्या या अड्‌ड्याचा मूख्य सूत्रधार सुर्यकांत गाडे हा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचा चुलत भाऊ तर पंचायत समिती सभावती संजय गाडे यांचा सख्खा भाऊ आहे.

close