तेल भेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या कार्यकर्त्यांवर हल्ला

February 1, 2011 3:11 PM0 commentsViews: 2

01 फेब्रुवारी

राज्यात तेल माफियांविरोधात धाडसत्र सुरूच आहे तर तेल माफियांवर कारवाई करण्यास गेलेल्या सरकारी अधिकारी आणि पोलिसांवर हल्ले होतं आहे. दरम्यान धुळ्यात रॉकेलभेसळीच्या विरोधात आवाज उठवणार्‍या लोकसंग्राम पक्षाच्या कार्यकर्त्यांवर रॉकेल माफियांनी दगडफेक केली. मोहाडीतल्या रॉकेलमाफियांच्या विरोधात लोकसंग्राम पक्षाने जाहीर सभा आयोजित केली होती. त्यावेळी त्या सभेवर दगडफेक करण्यात आली. त्यात तीन कार्यकर्ते जखमी झाले आहेत.

close