जैतापूर प्रकल्पाबद्दल अफवा पसरवणार्‍यांना रोखलं पाहिजे – साळगावकर

February 1, 2011 3:19 PM0 commentsViews: 1

01 फेब्रुवारी

जैतापूर अणूउर्जा प्रकल्पविरोधी आंदोलनाला फ्रान्सच्या विरोधातले दोन भांडवलशाही देश आर्थिक पाठबळ पुरवत असल्याचा दावा कामगार आणि रोजगार नियोजन आयोगाचे सदस्य जयराज साळगावकर यांनी केला. कोकण मराठी साहित्य परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या कोकण विकासाच्या नव्या दिशा या परिसंवादात ते बोलत होते. जैतापूर अणुउर्जा प्रकल्प हा अत्यावश्यकच असून या प्रकल्पाबाबत स्थानिकांमध्ये अनेक अफवा पसरवण्याचं काम करणार्‍यांना रोखलं पाहीजे असंही ते म्हणाले आहेत.

close