वैद्यकीय सेवा महागली

February 1, 2011 5:02 PM0 commentsViews: 14

01 फेब्रुवारी

महागाईनं सामान्यांचं कंबरड आधीच मोडलं असतांना त्यात आणखी एक भर पडली आहे. राज्यशासनाने परिपत्रक काढून राज्यातल्या सर्व सरकारी दवाखान्यातून पुरविल्या जाणार्‍या वैद्यकीय सेवांमध्ये तब्बल 30 टक्याने वाढ केली आहे. ही दरवाढ 1 फेब्रुवारी म्हणजे आजपासून लागू करण्यात आली आहे. याआधी शासनाने 10 जुलै 2001 रोजी रुग्णसेवेचे दर निश्चित केले होते. आता दहा वर्षानंतर या दरांमध्ये वाढ करण्यात आली. सर्वच क्षेत्रामध्ये झालेली दरवाढ, औषधांच्या आणि उपकरणांच्या वाढलेल्या किमतीमुळे शाषणाने ही दरवाढ केल्याचे सागण्यात आलं होतं. या दरवाढीचा फटका पुन्हा एकदा मध्यम वर्गीयांनाच बसणार आहे कारण वैद्यकीय सेवेतील ही दरवाढ दारिद्र्य रेषेखालील नागरीकांना तसेच जेष्ठ नागरीक तसेच स्वातंत्र्य सैनिकांना लागू नाही त्यांना ह्या वैद्यकीय सेवा पुर्वी प्रमाणेच मोफत पुरविल्या जाणार आहेत या दरवाढीवर सामान्य नागरीकांनी रोष व्यक्त केला आहेत.

close