केंद्राच्या इशार्‍यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करतात – चिदंबरम

February 1, 2011 5:53 PM0 commentsViews: 2

01 फेब्रुवारी

सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची आज दिल्लीत अंतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर बैठक झाली. त्यात राजकीय खडाजंगी पाहायला मिळाली. केंद्र सरकारने दिलेल्या इशार्‍यांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करतात असा आरोप केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केला. त्यासाठी त्यांनी पुणे आणि वाराणसी बॉम्बस्फोटांचे उदाहरण दिले. त्यावर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी प्रत्युत्तर दिलं. देशाच्या अंतर्गत सुरक्षेला मोठा धोका भ्रष्टाचारापासून असल्याचे ते म्हणाले. नक्षलवादी हल्ल्यांच्या मुद्यावरूनही गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि चिदंबरम यांच्यात खडाजंगी झाली. नक्षलवाद्यांचे बळ वाढले असल्याचे मोदी म्हणाले. त्यावर नक्षल प्रभावित भागातल्या हल्ल्यांमध्ये मोठी घट झाली असल्याचा दावा चिदंबरम यांनी केला.

close