रेल्वेच्या टपावरून प्रवास करणार्‍या 9 जणांचा मृत्यू

February 1, 2011 5:56 PM0 commentsViews: 4

01 फेब्रुवारी

उत्तर प्रदेशमध्ये रेल्वेच्या टपावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना जीव गमावावा लागला. त्यात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. जम्मू-तावी एक्सप्रेसच्या टपावरून काही जण प्रवास करत होते. त्यावेळी उच्च दाबाची इलेक्ट्रिक वायर त्यांच्यावर पडली. आणि त्यात 9 जणांचा मृत्यू झाला. तर इतर अनेकांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेनंतर संतापलेल्या प्रवाशांनी शाहजहानपूरमध्ये जम्मू-तावी एक्सप्रेसच्या तीन बोगी पेटवल्या.

close