अहमदनगरमध्ये मंत्र्यांच्या पीएने लाच मागण्याची तक्रार

February 1, 2011 6:07 PM0 commentsViews: 1

01 फेब्रुवारी

अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री अनिल देशमुख यांचे पीए अहिवर आणि जिचकर यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार अहमदनगर मध्ये प्रकाश लोळगे यांनी केली आहे. रॅाकेलची भागिदारी संस्था स्थलांतरित करण्यासाठी ही लाच मागितली असा लोळगे यांचा आरोप आहे. 18 फेब्रुवारी 2010 ला लोळगे यांनी अनिल देशमुखांच्या कार्यालयामध्ये अर्ज केला होता. मात्र त्यांना लाच दिल्याशिवाय परवानगी मिळणार नाही असं सांगण्यात आलं होतं. त्यानंतर अर्ज केलेल्या व्यक्तीने मागितलेल्या पैशांची पूर्तता केल्यानंतर त्यांना परवानगी देण्यात आली. मात्र आपली परवानगी लाच न दिल्याने अजूनही रखडली असा आरोप लोळगे यांनी केला.

close