नाशिकमध्ये लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं

February 2, 2011 9:26 AM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारीनाशिकमध्ये आज सकाळी लष्कराचं चिता हेलिकॉप्टर आर्मी एव्हीएशन परिसरात कोसळलं.या अपघातात दोन्ही पायलट ठार झाले आहेत. मेजर गर्जे आणि मेजर भानूप्रसाद गुप्ता असं ठार झालेल्या पायलट्स नांव आहे. भानुप्रसाद गुप्ता आणि मेजर गर्जे जयपूरच्या आर्मी एव्हीएशन बेसचे आहेत. ते दोघे एअर शोची तयारी करत होते. टेक ऑफ घेतल्यानंतर जाचक-नगर परिसरात हेलीकॉप्टर कोसळलं. या परिसरातल्या पाटील यांच्या बंगल्याजवळ हेलिकॉप्टर कोसळलं. हेलीपॅडपासून 1 ते 2 किलोमीटर अतंरावर हे ठिकाण आहे. मोकळ्या जागेत हेलिकॉप्टर कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. -20 वर्षांपासून लष्कराच्या सेवेत डोंगराळ प्रदेशात लष्कराचं साहित्य आणि जवान पोहोचवण्यासाठी उपयुक्त – 18 ते 20 हजार मीटर उंचीपर्यंत जाण्याची क्षमता कारगिल युद्धात 'चिता'ची महत्त्वाची भूमिका

close