मनसेची आता रेल्वे भरतीसाठी मोहीम

February 2, 2011 9:33 AM0 commentsViews: 5

02 फेब्रुवारी

रेल्वे भरतीत मराठी उमेदवारांना डावलण्यात येत असल्याची जोरदार टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. जास्तीत जास्त मराठी मुलांनी रेल्वेच्या परीक्षेचे फॉर्म भरावेत असं आवाहन त्यांनी केलं आहे. मनसेचे कार्यकर्ते यासाठी मदत करणार आहेत. मुंबईत मनसेच्या पदाधिकार्‍यांचा राज्यस्तरीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना राज ठाकरे यांनी अनेक मुद्दे उपस्थित केले. पुढच्या वर्षी राज्यात काही महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीसाठी मनसेच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करणार आहेत. 15 फेब्रुवारीपासून रेल्वे भरती फॉर्म भरले जाणार आहेत. राज्यातल्या मुला-मुलींमध्ये जागृती करण्यासाठी सर्वत्र होर्डिंग्ज लावा असं राज यांनी म्हंटलं आहे.

close