पुण्यात हेरगिरीच्या आरोपावरुन एका संशियताला अटक

February 2, 2011 10:02 AM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

पुण्यातून हेरगिरीच्या आरोपावरुन एकाला अटक करण्यात आली आहे. ही व्यक्ती आयएसए एजंट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येतो. हा तरुण 25 वर्षांचा आहे. त्याला अडीच वाजता न्यायालयात हजर करण्यात आलं. दरम्यान पुढील सुनावणी चार वाजता आहे. तो निगडीमधल्या एका ट्रान्सपोर्ट एजन्सीमध्ये नोकरी करतो. अलंकार टॉकीजवळून पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. लष्करातील एका शिपायाच्या मदतीने तो हेरगिरी करत असल्याचा पोलिसांना संशय आहे. लष्करातल्या या शिपायाच्या मदतीने या तरुणाने पाकिस्तानला काही महत्वाची कागदपत्रं दिल्याचा पोलिसांना संशय आहे. तसेच काही महत्वाचे कागदपत्र या युवकाकडून जप्त ही करण्यात आली आहे. काल रात्री त्याला अटक करण्यात आली.

close