वर्ल्डकप जिंकणे हेच मास्टर ब्लास्टरला मोठं गिफ्ट – धोणी

February 2, 2011 11:06 AM0 commentsViews: 19

02 फेब्रुवारी

2011 चा वर्ल्डकप जिंकणे हेच मास्टर ब्लास्टरला मोठं गिफ्ट असेल, असं टीम इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं म्हटलं आहे. या वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया जय्यत तयारी करतेय असंही तो म्हणाला. वर्ल्ड कपच्या निमित्ताने सध्या ठिकठिकाणी प्रमोशनल इव्हेंट्स सुरू आहेत. अशाच एका दिल्लीतल्या इव्हेंटमध्ये धोणी, युवराज सिंग, हरभजन सिंग यांच्यासह सहभागी झाला होता.सचिनने यापुढचे आणखीही वर्ल्ड कप खेळावेत अशी सगळ्यांचीच अपेक्षा असल्याचंही धोणी म्हणाला.

close