अमरावतीत एकाच मंडपात 3700 जोडप्यांची बांधली गेली लग्नगाठ

February 2, 2011 11:20 AM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

अमरावतीमध्ये आज सकाळी अकरा वाजता एक ग्रँड विवाह सोहळा झाला. एकाच मंडपात 3700 वर जोडप्यांची लग्न झाली. हा सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा अपक्ष आमदार रवी राणा यांनी आयोजित केला होता. अमरावतीच्या एस टी स्टँण्ड मैदानावर हा कार्यक्रमआयोजित करण्यात आला होता. या लग्नासाठी पाच लाख वर्‍हाडी लग्नाला उपस्थित राहिले. यामध्ये हिंदू, मुस्लीम, ख्रिश्चन आणि बौद्ध समुदायाच्या वधूवरांची लग्न लावण्यात आली. या सोहळ्याला सहारा ग्रुपचे प्रमुख सुब्रतो राय, योगागुरु बाबा रामदेव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषीमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, उद्योगमंत्री नारायण राणे, अभिनेता विवेक ओबेरॉय, आदित्य पांचोली, तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. या लग्नसाठी पाच लाख लोकांच्या जेवणाची सोय करण्यात आली होती.

close