जैतापूर प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफवांना बळी पडू नये – राणे

February 2, 2011 11:36 AM0 commentsViews: 4

02 फेब्रुवारी

उद्योगमंत्री नारायण राणे 4 फ़ेब्रुवारीला जैतापूर अणुउर्जा प्रकल्पग्रस्तांशी चर्चा करणार आहेत. प्रकल्पग्रस्तांनी विरोधी पक्षाच्या अफ़वांना बळी पडू नये अशी विनंती राणे यांनी केली. जैतापूर परिसरातच आपलं घर आणि नातेवाईकांची घर असल्याचे राणे यांनी सांगितलं. हा प्रकल्प धोकादायक असता तर त्याचं समर्थन केलं नसतं असं राणे यांनी स्पष्ट केलं. प्रकल्पग्रस्तांना जाहीर करण्यात आलेल्या पॅकेज आणि पुनर्वसनाची शंभर टक्के अंमलबजावणी होईल असं आश्वासन ही त्यांनी दिलं. राणेंच्या या दौर्‍याला प्रकल्पग्रस्तांचा कसा प्रतिसाद मिळतोय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

close