जळगावमध्ये 620 लिटर केमिक्ल साठा जप्त

February 2, 2011 11:50 AM0 commentsViews: 7

02 फेब्रुवारी

जळगावमधल्या पारोळ्यात प्रशासनानं टाकलेल्या धाडीत केमिकलचा मोठा साठा जप्त करण्यात आला. केमिकल अत्यंत ज्वलनशील असल्याने त्याचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. हा साठा नाफ्त्याचा असल्याचे बोललं जातं आहे. म्हसवे शिवारात हा साठा जप्त करण्यात आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली. सापडलेल्या 4 टाक्यांमध्ये जवळपास 620 लिटर रसायन सापडलं आहे. याबाबत शिवसेनेचे पारोळा शहरप्रमुख अण्णा चौधरी यांच्याविरुध्द पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यांत आला आहे.

close