नवी मुंबईत केमीकल कंपनीला भीषण आग

February 2, 2011 12:00 PM0 commentsViews: 2

02 फेब्रुवारी

नवी मुंबईत तळोजा एमआयडीसीमध्ये आज दुपारी मोठी आग लागली आहे. इथल्या 'बुनीसा' या केमिकल कंपनीमध्ये ही आग लागली. आणि या आगीनं उग्र रुप धारण केल्यानं या कंपनीच्या आजुबाजुच्या तीन कंपन्या आगीच्या लपेटमध्ये आल्या आहेत. तळोजा एमआयडीसी, नवी मुंबई आणि सिडको फायर ब्रिगेडच्या गाड्या ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत.अजुनही ही आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आलेलं नाही. दरम्यान या केमिकल कंपनीत क्लोरिनचा साठा मोठ्या प्रमाणात होता. तिथून 8 टनेल इतका साठा फायर ब्रिगेडच्या जवानांनी वेळीच बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली.

close