अमेरिकेत मतदानाला सुरुवात

November 4, 2008 11:15 AM0 commentsViews: 6

4 नोव्हेंबर, अमेरिकाअमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरूवात झाली आहे. दरम्यान बराक ओबामा आणि जॉन मॅकेन यांचा प्रचार दौरा सोमवारीही जोरात सुरू होता. मतदानाला काही तास बाकी असताना बराक ओबामा यांनी आघाडी घेतल्याचं दिसत आहे. काही पाहणीनुसार फ्लोरिडा, ओहिओ आणि इतर काही राज्यांमध्ये दोन्ही प्रतिस्पर्ध्यांत रस्सीखेच आहे. काही राष्ट्रीय चाचण्यांनुसार ओबामा यांनी मॅक्केन यांच्यावर 11 पॉइंट्सची आघाडी घेतली आहे. तर, इतर अनेक महत्त्वाच्या चाचण्यांध्ये ओबामा यांनी 7 ते 8 टक्के आघाडी घेतल्याचं चित्र आहे.दरम्यान, अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडी घेणार्‍य ओबामा यांना एक धक्काही सहन करावा लागला. त्यांची आजी मॅडेलिन दुनहम यांचं सोमवारी सकाळी हवाईमध्ये निधन झालं. ओबामा यांना घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

close